- ऑनलाइन लोकमत
मनिला, दि. 2 -फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांचं शहर दावोसमध्ये स्फोट झाला असून 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार एका हॉटेलबाहेर झालेल्या या स्फोटात 10 जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. स्फोट झाला तेव्हा राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते दावोस शहरातच होतं. मात्र ते सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्ट्रीट मार्केटमध्ये असलेल्या मार्को पोलो हॉटेलच्या बाहेर हा स्फोट झाला. 30 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.