शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भारतीय ख्रिश्चन प्रिस्टना लवकरच सोडवू- परराष्ट्र मंत्री

By admin | Published: April 03, 2016 2:35 PM

ख्रिश्चन प्रिस्ट सुरक्षित असून, त्यांना लवकरच मुक्त करण्यात येणार असल्याचं सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं सांगितलं

येमेन, दि. 03- येमेनमध्ये भारतीय ख्रिश्चन प्रिस्टचं गेल्या महिन्यात अपहरण झालं होतं. ते ख्रिश्चन प्रिस्ट सुरक्षित असून, त्यांना लवकरच मुक्त करण्यात येणार असल्याचं सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं सांगितलं आहे. दक्षिण येमेनमधल्या अडेन या शहरातून फादर टॉम यांचं अपहरण झालं होतं. बंदुकधारी दहशतवाद्यांनी त्यावेळी जवळपास 15 लोकांना ठार केलं होतं. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी या हल्ल्याचा निषेधही नोंदवला होता. सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं फादर टॉम यांच्या सुरक्षिततेसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. भारत सरकार ख्रिश्चन प्रिस्टना सुरक्षितरीत्या भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फादर जोसेफ चिन्नायन यांना सांगितलं आहे. फादरना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली आहे, असं फादर जोसेफ यांनी यावेळी सांगितलं. मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी मागच्या आठवड्यात इसिसच्या दहशतवाद्यांनी फादर यांची हत्या केल्याचं वृत्त दिलं होतं. आणि गेल्या महिन्यात चार भारतीय ननच्या झालेल्या हत्येचीही अद्याप कोणी जबाबदारी स्वीकारली नाही आहे.