वॉशिंग्टन : मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडामधील व्यावसायिक व २००८ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याबाबतची सुनावणी २२ एप्रिल २०२१ पर्यंत चालण्याची शक्यता आहे. भारताने राणाला (५९) फरार घोषित केलेले आहे. मुंबई हल्ल्याच्या संदर्भात त्याच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता व त्यात अमेरिकेचे ६ नागरिक होते.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची सुनावणी २२ एप्रिलपर्यंत चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 5:59 AM