शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
3
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
4
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
5
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
6
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
7
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
8
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
9
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
10
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
11
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
12
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
13
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
14
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
15
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
16
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
17
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
18
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
19
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
20
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

सावधान! कोरोनापेक्षा अत्यंत धोकादायक व्हायरस आढळला; कांगोमध्ये एक रूग्ण सापडला

By प्रविण मरगळे | Published: January 06, 2021 1:42 PM

Disease X: कोरोना संकटाच्या काळात आता आणखी एक भयंकर रोगाची साथ आल्यानं लोकांच्या मनात धडकी भरली आहे.

ठळक मुद्देजगात नव्या व्हायरसने पाय रोवला आहे, या घातक व्हायरसचं नाव डीसीज एक्स(Disease X)कोरोनासारखा पसरणारा संसर्गजन्य रोग असून इबोला व्हायरसप्रमाणे धोकादायककांगो गणराज्यात डीसीज एक्सचा एक रूग्ण आढळून आला आहे

नवी दिल्ली - २०२० मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसमुळे अवघं जगाचं जनजीवन विस्कळीत झालं, कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले, लाखो लोकांनी आपले प्राण गमावले, या जीवघेण्या महामारीमुळे बहुतांश देशात लॉकडाऊन लागू केलं, सोशल डिस्टेसिंग, मास्क वापरणं, हात धुणे, सॅनिटायझर वापरणं ही लोकांची जीवनशैली बनली, कोरोना महामारी संपुष्टात येण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक रात्रंदिवस मेहनत घेत होते, कोरोनावर लस शोधण्यात यश आलं, परंतु अद्याप कोरोनाची दहशत संपली नाही.

कोरोना संकटाच्या काळात आता आणखी एक भयंकर रोगाची साथ आल्यानं लोकांच्या मनात धडकी भरली आहे. वैज्ञानिकांनी याबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगात नव्या व्हायरसने पाय रोवला आहे, या घातक व्हायरसचं नाव डीसीज एक्स(Disease X). वैज्ञानिकांच्या इशाऱ्यानुसार डीसीज एक्स कोरोनासारखा पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि इबोला व्हायरसप्रमाणे धोकादायक आहे. 

१९७६ मध्ये इबोला व्हायरसचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिक प्रोफेसर जीन जैक्स मुएम्बे टॅमफमने या व्हायरसबाबत इशारा दिला आहे. हा आजार जगासाठी विनाशाचं कारण होऊ शकतं, आफ्रिकेच्या उष्णपट्ट्यातून हा व्हायरस सापडला आहे, मानवासाठी हा व्हायरस जीवघेणा आहे. सोशल मीडियावर हा व्हायरस ट्रेंड करत आहे. कोविड १९ पेक्षा Disease X व्हायरस अत्यंत धोकादायक आहे, कांगो गणराज्यात डीसीज एक्सचा एक रूग्ण आढळून आला आहे, त्याला सुरुवातीला रक्तस्त्रावी तापाची लक्षणं दिसून आली, पहिल्यांदा डॉक्टरांना हा इबोला व्हायरस वाटला परंतु तपासानंतर या रूग्णांत डीसीज एक्स लक्षण असल्याचं समोर आलं.  

दरम्यान, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते.  कोरोना लशीच्या इमरजन्सी वापरासंदर्भात DCGIने 3 जानेवारीला (रविवार) आपली मंजुरी दिली होती. यानुसार, 13 अथवा 14 जानेवारीपासून देशात कोरोना लसिकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. 

लोकांपर्यंत कशी पोहोचेल लस? लस लोकांपर्यंत कशी पोहोचेल? यावर आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले, की लस कॅरियरच्या माध्यमाने कोल्ड चेन प्वाइंट्सने सर्व सेंटर्सपर्यंत (हे जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्र, कम्यूनिटी सेंटर्स असू शकतात.) एक रेफ्रिजिरेटर अथवा इंस्युलेटेड व्हॅनच्या (पॅसिव्ह इक्विपमेन्ट, आईस बॉक्स अथवा टेम्परेचर कंट्रोल्ड आदि) माध्यमाने नियोजित स्थळी पाठवली जाईल.

देशात 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत राजेश भूषण म्हणाले, देशात करनाल, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत. लॅबमधून लशी GMSD डेपोने या चारही स्टोर्सपर्यंत हवाई मार्गाने पाठवल्या जातील. यानंतर देशातील 37 लस केंद्र आहेत आणि येथेच लशी स्टोअर केल्या जातील. यानंतर, लशी बल्कमध्ये जिल्हा स्तरावर पाठवल्या जातील

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या