शहरं
Join us  
Trending Stories
1
वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...
2
आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२४, मान - प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील
3
धक्कादायक! मुंबईकर दररोज शोषत आहेत पाच सिगारेटएवढा धूर
4
विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका
5
विशेष लेख: मविआची महामुंबईतील सगळी भिस्त उद्धवसेनेवर!
6
नागरिकांसाठी आनंदाची बातमी; स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी, सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय!
7
ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा
8
विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील; पावणे तीन कोटींचे सोने जप्त
9
पोलिसांच्या तावडीतून निसटलेला प्रिन्स जेरबंद; हलगर्जीपणामुळे हवालदारावर कारवाई
10
सात महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांच्या हवाली; मध्य रेल्वेचे ऑपेरेशन ‘नन्हे फरिश्ते’ यशस्वी
11
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
12
सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी; प्रवाशांना पूर्वकल्पना न दिल्याने गोंधळ
13
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
14
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
15
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
16
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
17
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
18
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
19
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
20
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!

काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ नको

By admin | Published: February 03, 2016 2:51 AM

काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ देण्याचे सरकारने टाळावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी काश्मीरमधील हल्ल्यांत सहभागी असलेल्या गटांवर कारवाई करावी,

इस्लामाबाद : काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ देण्याचे सरकारने टाळावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी काश्मीरमधील हल्ल्यांत सहभागी असलेल्या गटांवर कारवाई करावी, असे पाकिस्तानच्या संसदीय समितीने म्हटले आहे.नॅशनल असेम्ब्लीच्या स्थायी समितीने (परराष्ट्र व्यवहार) सोमवारी काश्मीरशी संबंधित आपले चार पानी धोरण प्रसिद्धीस दिले, त्यात वरील सूचना करण्यात आली आहे, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले. पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील अतिरेकी, सशस्त्र, बंदी घातलेल्या गटांना प्रोत्साहन द्यायला नको, असे या समितीने म्हटले आहे. समितीने भारत-पाकिस्तान संबंधांवर अनेक धोरणात्मक सूचना केल्या आहेत. पाकमधून भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या गटांवर कारवाई करण्याची भारताची सतत मागणी आहे.या समितीचे प्रमुख पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज शरीफ) नॅशनल असेम्ब्ली सदस्य अवैज अहमद लेघारी आहेत. या समितीने काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या गटांवर पाकिस्तान पुरेशी कारवाई करीत नाही ही आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी हिंसक सशस्त्र संघटनांविरुद्ध कारवाई केली पाहिजे, अशी शिफारस केली आहे. पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण हे देवाणघेवाण, कपात करणे, फेरसुरुवात आणि निकाल या चार महत्त्वाच्या तत्त्वांवर आधारित हवेत. भारताशी संबंधित प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत संबंध ठेवले पाहिजेत, असेही समितीचे म्हणणे आहे. या वरील चार तत्त्वांवर अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही, तर पाकिस्तान सरकारने भारताशी काश्मीर, पाणी, व्यापार आणि संस्कृती आणि दूरसंचार या महत्त्वाच्या विषयावर संबंध ठेवले पाहिजेत, अशी समितीची सूचना आहे.