लंडन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. युरोप आणि अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक देश कोरोना व्हायरसवरील लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच धरतीवर इंग्लंडमधील ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्या महिलेवर पहिल्यांदाच या लसीचा प्रयोग करण्यात आला त्यांची प्रकृती स्थिर असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे. एलिसा ग्रॅनाटो, असे त्यांचे नाव असून, त्या एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.
मायक्रोबायोलॉजिस्ट एलिसा यांना शुक्रवारी ही लस टोचण्यात आली होती. यानंतर आज (रविवारी) त्यांचे निधन झाल्याचं वृत्त अनेकांनी दिलं होतं. परंतु तसं काहीही झालेलं नसून त्या ठणठणीत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आपली प्रकृती उत्तम असल्याचं स्वत: एलिसा यांनीच सांगितलं आहे. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी ही लस विकसित केली आहे.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!
एलिसा ग्रॅनाटो यांच्यासंदर्भात संशोधकांनी एक निवेदनही दिले होतं. यात, लस घेतल्यानंतर काही तासांनी एलिसा यांच्या शरीरातील गुंतागुंत वाढल्याचं सांगण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली असताना कोरोनावरील प्रायोगिक लस घेण्याची हिंमत दाखवणाऱ्या एलिसा, या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ज्या दोन जणांना सर्वप्रथम ही लस टोचण्यात आली. त्यापैकी एलिसा एक आहेत. आणखी चार स्वयंसेवकही या लसीच्या रिऍक्शनशी फाईट करत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
"अत्यवस्थ असलेले हे चारही जण बरे होतील आणि त्यांना देण्यात आलेल्या या लसीची रिअॅक्शन अपेक्षितच होती." तसेच ही लस लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी, या निरीक्षणांचा तिच्यात अधिक सुधारणा करण्यासाठी उपयोग होईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
अलर्ट! 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, लष्कराला देण्यात आलाये 'असा' आदेश
स्वतःवर झालेल्या मानवी चाचणीनंतर एलिसा म्हणाल्या होत्या, एक वैज्ञानिक म्हणून मला या संशोधनाला पाठिंबा द्यावा वाटतो. आतापर्यंत या विषाणूवर कोणताही अभ्यास न केल्याबद्दल मला वाईट वाटले, परंतु आता मला, असे वाटते की सहयोग करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.