वॉशिंग्टन : दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये सुमारे ७० हजार जणांना बनावट लस दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका खासगी क्लिनिकमध्ये कोरोना लस देण्याच्या बहाण्याने प्रति डोस ११०० रुपये घेतल्याचे समोर आले आहे. कोरोनामुक्त होण्यासाठी स्थानिकांना तीन डोस दिले जात होते, अशी माहिती मिळाली आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कोरोना लस देणाऱ्या क्लिनिकचे कर्मचारी स्थानिकांना सांगत की, कोरोना लसीचे तीन डोस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाला लढा देणारी रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल. कोरोना लसीच्या नावाखाली नेमके कोणते औषध स्थानिकांना देण्यात आले, याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळालेली नाही.
शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका गुप्तहेराने या खासगी क्लिनिकचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. लुसिया पेनाफीन यांनी मास्क घातले नव्हते. क्लिनिलमधील सर्व कर्मचारी कोरोनामुक्त असल्याचा दावाही या डॉक्टर महिलेने केला. सुमारे ७० हजार स्थानिकांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले आहेत.
सदर माहिती मिळताच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी या क्लिनिकवर छापा टाकला. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत डॉक्टर महिलेने सांगितले की, कोरोना रुग्णांना व्हिटामीन आणि सीरम लसीचा डोस दिला गेला. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागेल. एवढेच नव्हे, तर कोरोना रुग्णांवर लेझर ट्रीटमेंट आणि इन्फ्रारेड लाइट्सचा वापर करून उपचार केले जात होते, असेही या डॉक्टर महिलेकडून सांगण्यात आले.
एका अहवालानुसार, बनावट कोरोना लस देणाऱ्या क्लिनिकमध्ये पोलीस कर्मचारी, सैनिक आणि राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्थानिकांनी डॉक्टर महिलेची बाजू घेऊन त्यांनी कोरोना संकटात स्थानिकांवर उत्तम पद्धतीने उपचार केल्याचे सांगितले. पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.