बिजिंग : पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सचे सुखोई हे लढाऊ विमान तैवानने पाडल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, तैवानने आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे विमान पाडले नसल्याचा दावा करत हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच हे द्वेषपूर्ण कृत्य असल्याचा करार तैवानने दिला आहे.
तैवानच्या सोशल मिडीयावर सकाळी सकाळी मोठी खळबळ उडाली होती. चीनच्या सुखोई Su-35 लढाऊ विमानाला देशाच्या हवाई सुरक्षा प्रणालीने मिसाईल डागून पाडल्याचे म्हटले होते. यानंतर तैवान हवाई दलाने लगेचच प्रसिद्धी पत्रक काढून या घटनेचा इन्कार केला आहे. ही चुकीची माहिती असून धादांत खोटी आहे. जगभरातील लोकांना फसविण्यासाठी अत्यंत खोडसाळपणे खोटी माहिती इंटरनेटवर पसरविण्यात आली, असे म्हटले आहे.
'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको
तैवानचे हवाई दल देशाच्या हवाई हद्दीचे रक्षण करण्यास सक्षम आहे. मुख्यालयातून समुद्र आणि हवाई हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. तसेच खोट्या बातम्या पसरू नयेत यासाठी वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित केली जात आहे. सोशल मिडीयावरील वृत्तांना टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मिडीयावर विमान पडतानाचे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघतानाचे व्हिडीओ फिरत आहेत. हे व्हिडीओ अज्ञात स्थळावरचे आहेत. तसेच अनेक युजरनी ही खोटी बातमी असल्याचे म्हटले आहेत. हे विमान तांत्रिक समस्येमुळे पडत असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या दोन विमानांनी काही दिवसांपूर्वी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. तेव्हा तैवानने त्यांच्यावर मिसाईल डागून पळवून लावले होते. या दोन्ही देशांमधील तणावाचा फायदा समाजकंटक करून घेत आहेत.
EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'
रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार
IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा
चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा