वाॅशिंग्टन : सध्या तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन सप्ताहाचा माेठा उत्साह आहे. अनेक जाेडपी या आठवड्यात आपल्या नात्यात गाेडवा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही तरुण नवे नाते जाेडण्यासाठी इच्छुक दिसतात. मात्र, अमेरिकेतील तब्बल ३० टक्के लाेकसंख्या सिंगल आहे. धक्कादायक बाब म्हणजे, माेठ्या प्रमाणावर लाेकांना प्रेमात पडायचे नसून ते स्वत:साेबतच खुश असल्याचे समाेर आले आहे. तर २२ टक्के लाेक जाेडीदाराच्या शाेधात आहेत.
‘प्यू’ रिसर्चच्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे. अमेरिकेत १० पैकी ३ जण ना विवाहित आहेत ना काेणासाेबत नात्यात आहेत. बहुतांश तरुणाई स्वत:साेबतच खुश आहे. त्यात वांशिक वर्गीकरण केल्यास ४७ टक्के तरुण सिंगल आहेत. तर त्यापैकी ४५ टक्के लाेक जाेडीदाराचा शाेध घेण्यासाठी ऑनलाईन डेटिंग ॲपचा वापर करीत आहेत. (वृत्तसंस्था)
जाेडीदाराचा शाेध घेणारे घटले२०१९ मध्ये नात्यात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे प्रमाण ४९% हाेते. धक्कादायक म्हणजे, दाेन वर्षांनी हा आकडा घटून ४२ टक्क्यांवर आला. २०१९ मध्ये ६१% पुरुष जाेडीदाराच्या शाेधात हाेते. २०२० मध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण अनुक्रमे ३८ आणि ३५ असे आढळले.
ऑनलाइन डेटिंगला पसंतीऑनलाइन डेटिंगमध्ये दाेन्ही पर्याय खुले असल्याने जाेडीदार सहज मिळताे, असे ५१% लाेकांना वाटते. ५६% पुरुषांना राेमँटिक नाते हवे, तर असे नाते हवे असलेल्या महिलांचे प्रमाण ४४% आहे.
कमिटेड नाते नकाेnसिंगल असलेल्यांपैकी माेठ्या प्रमाणावर लाेकांना काेणत्याही नात्यात रुची नाही. हे प्रमाण ५७% आहे. nतर केवळ २२% लाेक जाेडीदाराच्या शाेधात असून त्यापैकी १३% लाेक कमिटेड तर ७% लाेक कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छितात.