पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये एका बसला भीषण अपघात झाला आहे. बस खोल दरीत कोसळली, यानंतर बसला आग लागल्याने ४८ प्रवाशांपैकी ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. लासबेलाचे सहा. आयुक्त हमजा अंजुम यांनी सांगितले की, अपघात खूप खतरनाक होता. मृतांची संख्या वाढू शकते.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात शनिवार-रविवार रात्री 2.15 वाजता झाला. बस क्वेटाहून कराचीला जात होती. वेग जास्त असल्याने पुलावरील पिलरला धडकून ती दरीत कोसळली. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने आतापर्यंत एक महिला आणि एका मुलासह तीन जणांना वाचवले आहे.
अपघातानंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. आग खूपच भीषण असल्याचे एका फायरमनने सांगितले. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. सुमारे २ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. अपघातात अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे. त्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.