एका फार्मासिस्टला त्याच्या मेडिकलमध्ये ठेवलेल्या बॉटलमधील दारू प्यायल्याने मोठी गंभीर स्थिती उद्भवली आहे. ४३ वर्षीय फार्मासिस्ट हंस मोर्कोस कोमामध्ये गेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या दारुच्या बॉटलमध्ये असा एक पदार्थ होता, ज्यामुळे मोर्कोस आज मृत्यूशी झुंज देत आहे.
या दारुच्या बॉटलमध्ये मेथॅम्फेटामाइन नावाचा द्रव पदार्थ होता. हा पदार्थ त्याने दारुच्या बॉटलमध्ये टाकलेला की आधीपासूनच होता हे समजू शकलेले नाही. तरीही तपास यंत्रणांनी त्याने दारुच्या बॉटलमध्ये हे मेथॅम्फेटामाइन ड्रग टाकले असावे आणि त्याचे घोट प्यायले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. अन्नाडेल नावाचे त्याचे मेडिकल आहे. त्यामध्ये ३१ जानेवारीला त्याच्याकडे हे दारुच्या बॉटलचे पार्सल आले होते. मोर्कोसला दोन मुले आहेत.
या वेळी एक महिला त्याच्या दुकानात आली होती, तिने त्याला अत्यवस्थ अवस्थेत पाहिले आणि अॅम्बुलन्स बोलविली. त्याला रॉयल प्रिंस अल्फ्रेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तो कोमामध्ये असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज या घटनेला १९ दिवस झाले तरी तो कोमामध्येच असून डॉक्टरांनी तो मृत्यूशी झगडत असल्याचे सांगितले.
पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यांनी मेडिकलमधील संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. मेथॅम्फेटामाइन, ज्याला बर्फ म्हणूनही ओळखले जाते, हे एक धोकादायक आणि व्यसनाधीन औषध आहे. ती दारूच्या बाटलीत का होती हे अद्याप कळू शकलेले नाही.