इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचानक लाहोर भेटीचे पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. नात्याचे नवे पर्व सुरू करणाऱ्या या भेटीने उभय देशांतील संबंध सुधारण्यास मदत होईल, असा विश्वासही संसदेत विरोधी बाकांवर असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीसह इतर पक्षांनी व्यक्त केला.‘पीपीपी हा आमचा पक्ष मोदींच्या भेटीचे स्वागत करतो,’ असे संसदेतील विरोधी पक्षनेते सईद खुर्शिद शाह यांनी सांगितले. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी टिष्ट्वटरवरून मोदींचे स्वागत केले. ‘नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात स्वागत. सर्व प्रलंबित मुद्दे सोडविण्यासाठी सतत संपर्क ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे,’ असे टिष्ट्वट बिलावल यांनी केले. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचा प्रमुख इम्रान खान यांनीही मोदींच्या अचानक दौऱ्याचे स्वागत करून, यामुळे उभय देशांतील संबंध सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. मोदींच्या दौऱ्याचे स्वागत करताना संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘मोदींची ही भेट प्रदेशात स्थैर्य आणि शांततेसाठी लाभदायक ठरेल. पाकला शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत,’ असेही ते म्हणाले.यामुळे शांततेस गती मिळेलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अचानक पाक दौरा उभय देशांतील शांती प्रक्रियेला निश्चितच गती देईल, अशा प्रतिक्रिया अमेरिकन माध्यमांनी व्यक्त केल्या. ‘सीएनएन’ने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील संबंध बर्फासारखे घट्ट झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या या पवित्र्याने हा बर्फ वितळण्यास मदत होईल. अण्वस्त्रांनी सज्ज अशा दोन्ही देशातील ताणलेल्या संबंधांचे ‘रीसेट’ बटन मोदींनी दाबले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांच्यात होणारी बोलणी सुकर होतील, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ‘वॉश्ािंग्टन पोस्ट’ ने व्यक्त केली. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ ने वरीलप्रमाणेच मिळतेजुळते मत व्यक्त केले, तर संबंध सुधारण्यासाठी केलेले योग्य प्रयत्न, असे ‘शिकागो ट्रिब्यून’ ने म्हटले आहे. ‘टाइम’ मॅगझिनने म्हटले आहे की, ‘नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथ ग्रहण समारंभाला दक्षिण आशियाई देशातील नेत्यांना बोलावून जसा आश्चर्याचा धक्का दिला, अगदी तसाच याही वेळी बसला.’
पाकिस्तानमध्येही अनुकूल मत
By admin | Published: December 27, 2015 12:10 AM