ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ : अमेरिकेत येणाऱ्या लोकांना आता पासपोर्ट सोबतच सोशल मिडियाची माहीती द्यावी लागणार आहे. फेसबूक, ट्विटर या सोशल मीडीयाच्या खात्याबाबतची माहीती द्यावी लागणार आहे. अमेरिकन सरकरने हा फतवा काढला आहे. नवीन येणाऱ्या लोकांना पासपोर्टसोबत एक फॉर्म दिला जाणार आहे. त्यामध्ये त्यांच्या सोशल मिडियावरील खात्यासंबधी माहीती भरावी लागणार आहे. यामधून त्यांचा दहशतवाद्यांशी संबध आहे का नाही ? हे पडताळाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकन सरकारने सांगीतले आहे. सोशल मिडियाची माहीती देण्याची मागीणी केली असली तरी त्यात त्यांच्या गोपनियता क्रमांक (पासवर्ड) चा समावेश नाही.
व्हिसा वेवर कार्यक्रमाद्वारे काही देशांमधील नागरीक व्हिसा नसतानाही 90 दिवस भेट देण्याची अथवा प्रवेशाची परवानगी देण्यात येते, यामध्ये अंतर्गत देश प्रविष्ट अभ्यागतांना त्यांच्या सोशल मीडियाबाबत माहीती देण्याची आवशकता नाही.
इसीससारखी दहशतवादी संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकतील नागरीकांना इसीसमध्ये दाखल करत असल्याचे उघड झाले होते. अमेरिकेत भेट देणाऱ्या नागरीकांचा दहशतवाद्यांशी संबध अथवा संपर्क असू शकतो, त्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर करून मनुष्यहानी व वित्तहानी घडवली जाऊ शकते. त्यासाठी व्हिसा बरोबर सोशल मीडियावरील खात्यांची माहिती घेतली जात आहे, त्याद्वारे दहशतवादी संघटनांशी त्यांच्या संबंधांबाबत तपासणी करण्यास सांगितले आहे.