शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

चीनमधील नव्या ‘हंता’च्या भीतीने सारे जग धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:07 AM

बिजिंग : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस किंवा औषध शोधण्यात जगातील एकाही देशाला अजून यश आलेले नसतानाच चीनमध्ये ‘हंता’ या ...

बिजिंग : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस किंवा औषध शोधण्यात जगातील एकाही देशाला अजून यश आलेले नसतानाच चीनमध्ये ‘हंता’ या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे एकाचा बळी गेला असून, या घटनेने जगातील अनेक देश पुन्हा धास्तावले आहेत.हंता विषाणूची बाधा झालेला माणूस शांडोंग प्रांतामध्ये काही कामासाठी बसने चालला होता. प्रवासातच त्याचे निधन झाले. हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या ३२ जणांची रक्त तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल काही दिवसांत आरोग्य अधिकाऱ्यांच्या हाती येणार आहे.असे आहे हंता विषाणूचे स्वरूपसेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार उंदीर किंवा मूषकवर्गीय प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या माणसाला हंता विषाणूचा संसर्ग होतो. आपल्या घराच्या आसपास उंदीर खूप झाले असले, तर या विषाणूची बाधा होण्याचा मोठा धोका आहे. धडधाकट लोकांनाही या विषाणूची लागण होऊ शकते. हंता या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीला संसर्ग होत नाही. उंदीर किंवा मुषकवर्गीय प्राण्यांची विष्ठा, मुत्र यांना स्पर्श झाल्यानंतर तेच हात एखाद्या माणसाने आपल्या नाक, डोळे, तोंड यांना लावले तर हंताचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. हंता व कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे सारखीच असतात. त्यामध्ये डोके दुखणे, पोटात दुखणे, आदी लक्षणे आहेत.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या