शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाकिस्तानवर आपत्ती, विघटन हाेण्याची भीती; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:49 PM

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या माझ्या पक्षाविरुद्ध लष्कराने कारवाई करावी यासाठी सत्ताधारी आघाडीने कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला.

लाहोर : पाकिस्तानवर लवकरच मोठी आपत्ती कोसळणार असून त्यामुळे या देशाचे विघटनही होऊ शकते, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या माझ्या पक्षाविरुद्ध लष्कराने कारवाई करावी यासाठी सत्ताधारी आघाडीने कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला.इम्रान खान हे सध्या लाहोरमधील झमान पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. तेथून त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, निवडणुका घेणे हाच पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता संपविण्याचा एकमेव मार्ग आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे नेते व नवाज शरीफ यांनी लंडनला पलायन केले. पाकिस्तानातील राज्यघटनेचे तसेच सरकारी यंत्रणांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. पाकिस्तानवर कोसळणार असलेली मोठी आपत्ती टाळण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पाकिस्तान वाचविणे शक्य होईल. इम्रान खान यांच्या निवासस्थानी ३० ते ४० दहशतवादी लपून बसले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या दहशतवाद्यांनी २४ तासांच्या आत पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, अशी मुदत त्यांना पाकिस्तान सरकारने बुधवारी दिली होती. ती मुदत गुरुवारी संपली. आता या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दले कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्या घराला सुरक्षा दलाच्या सैनिकांनी वेढा दिला असून, तिथे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांवर कडक कारवाईइम्रान खान यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या इमारतीतून अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील मुख्यालयावर तसेच लाहोर येथील कॉर्प्स कमांडरच्या घरावर हल्ले चढविले. त्या देशाच्या विविध प्रांतांमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या. हा हिंसाचार दहशतवाद्यांनी केला असल्याचा पाकिस्तान सरकार, लष्कराचा दावा आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान