शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत

By योगेश पांडे | Published: February 25, 2022 11:28 AM

युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’

योगेश पांडे

सातत्याने बॉम्बचे आवाज, आजुबाजूचे भेदरलेले चेहरे, सर्व दुकाने बंद असल्यामुळे दैनंदिन गोष्टींचा तुटवडा अन् अशास्थितीत आपल्या मायभूमीची लागलेली आस. कोणत्याही क्षणी एखाद्या बॉम्बच्या स्वरुपात मृत्यू समोर उभा ठाकण्याची शक्यता असतानादेखील युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये भारतीय लोकांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. मूळचे नागपुरातील व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एरोस्पेस सायंटिस्ट राजेश मुनेश्वर यांनी हा ‘आंखो देखा हाल’ ‘लोकमत’ला सांगितला आहे.

राजेश हे त्यांची पत्नी व मुलासह कीव्हमध्ये राहतात. सर्व हवाई वाहतूक बंद असल्याने भारतात परतण्यासाठी इतरांप्रमाणे त्यांचीदेखील धडपड सुरू आहे. युक्रेनच्या विविध शहरांमध्ये हल्ला झाल्यानंतर कीव्हजवळच रशियन सैन्याने हेलिकॉप्टरदेखील पाडले. सातत्याने आम्हाला बॉम्बहल्ल्यांचा आवाज ऐकू येत आहे. युक्रेनच्या सैन्याचादेखील प्रतिकार सुरू आहे. मात्र, कीव्हमधील दोन्ही विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

विमानतळाकडे निघालेले अनेक भारतीय नागरिक व विद्यार्थी रस्त्यांवर अर्ध्यातच अडकले आहेत. कीव्हमध्ये भारतीय दुतावास तसेच भारतीय नागरिकांनी अशा विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्यासाठी धाव घेतली आहे. काही लोकांना घरी तर काहींना शाळांत ठेवण्यात आले. अनेक विद्यार्थी कीव्हमधील भारतीय दुतावासासमोर जमले. या विद्यार्थ्यांना बसेसने रोमानियात नेणार आहेत. परंतु, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले. त्यांनी स्पेस लाॅन्च व्हेईकल प्रकल्पात युक्रेन सरकारसोबत काम केले आहे, हे विशेष.

सर्व दुकाने बंद, विद्यार्थ्यांचे हाल

  • हल्ला झाल्यानंतर युक्रेनच्या राजधानीतील सर्व दुकाने बंद झाली आहेत. तेथील सरकारने विशिष्ट शिबिरेदेखील लावलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली. 
  •  खाण्या-पिण्याच्या साहित्याचा तुटवडा आहे. आम्ही अगोदरपासूनच व्यवस्था केली होती व त्यातूनच भारतीय लोक इतर विद्यार्थ्यांची मदत करत आहेत. 

डोळ्यांनी दिसताहेत आगीच्या ज्वाळा

  • राजेशच्या घरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या झुलियानी विमानतळावर कधीही हल्ला होण्याची शक्यता आहे. 
  • पोलंड व रोमानिया या दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत व हा आशेचा मोठा किरण असल्याचे राजेश यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डोळ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहिल्या असून, काहीही करून मायदेशात परतायचे आहे.  

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना कतारमार्गे भारतात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि कतारमध्ये द्विपक्षीय बबल करारानुसार त्यांना प्रवास करता येईल. मात्र, युक्रेन ते कतारपर्यंतचे अंतर ४ हजार ५०० किलाेमीटर एवढे आहे. त्यामुळे कतारला कसे जावे, हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विमानाची साेय करावी; विद्यार्थ्यांचा टाहाेविद्यार्थ्यांची भारतात परतण्यासाठी धडपड सुरू आहे. शिव कार्तिक नावाच्या विद्यार्थ्याने तेथील परिस्थिती मांडली. ताे एअर इंडियाचे विमान पकडण्यााठी विमानतळावर पाेहाेचला. मात्र, हवाई हद्द बंद झाल्याचे तेथे गेल्यावर समजले. ताे म्हणाला, ‘विमानतळावरून विद्यापीठात परतणे शक्य नव्हते. त्यामुळे युक्रेनची राजधानी किव्ह येथील रेल्वे स्थानकावर आम्ही ५० विद्यार्थी अडकलेलाे आहाेत. परतण्यासाठी विमानाची साेय करावी.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत