शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे फार सन्मानाचं असतं. जर दोघांपैकी एकानेही या नात्याची सीमा ओलांडली तर या नात्याचा अपमान होतो. अशीच एक घटना अमेरिकेच्या एका शाळेतून समोर आली आहे. इथे एका शिक्षिकेने एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक काम केलं. एका महिला शिक्षिकेवर आरोप आहे की, तिने 16 वर्षाच्या एका मुलावर जबरदस्ती केली. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिका विवाहित आहे.
डेली मेल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय ट्रेसी वॅंडरहल्स्ट यूकेपा हाय स्कूलमध्ये शिकवत होती. पण गेल्या गुरूवारीला तिला पोलिसांनी अटक केली आणि सॅन बर्नाडीनो काउंटी डिटेंशन सेंटरमध्य कैद केलं. याचं कारण ट्रेसीने शाळेतील एका 16 वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केलं. ट्रेसी स्वत: दोन मुलांची आई आहे. ट्रेसीच्या जामीनाची रक्कम 24 लाख रूपये ठरवण्यात आली आहे.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ट्रेसीला 2017 मध्ये टीचर ऑफ द ईअरचा पुरस्कारही मिळाला होता. 2007 मध्ये तिचं जस्टिन नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. अशात तिच्या या कृत्यामुळे लोक हैराण झाले आहेत. ट्रेसीचा एक व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात ती मुलांना शिकवताना दिसत होती. शाळेकडून सांगण्यात आलं आहे की, शाळेतील मुलांची सुरक्षा त्यांची प्राथमिकता आहे.
गेल्या काही वर्षात अशा बऱ्याच धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांना असा अंदाज आहे की, महिलेने आणखीही काही मुलांसोबत असं काही केलं असावं. त्यामुळे या घटनेची गंभीरतेने चौकशी केली जात आहे. 2015 मध्ये एक अशी घटना समोर आली होती ज्यात महिला टीचरने तिच्या विद्यार्थ्यावर रेप केला होता, त्याचं तिच्या मुलीसोबत अफेअर सुरू होतं.