वॉशिंग्टन : “कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या आशियाई अमेरिकी आहेत. काही वर्षांपूर्वी तर त्या केवळ भारतीय असल्याचे सांगत होत्या,” अशी खोचक टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
शिकागो येथे बुधवारी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नालिस्ट्सच्या परिषदेत ट्रम्प म्हणाले, “त्या नेहमीच भारतीय वंशाची असल्याचा दावा करतात. आता त्या कृष्णवर्णीय म्हणून ओळख बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला माहीत नाही की त्या भारतीय आहेत की कृष्णवर्णीय?”
ट्रम्प यांचा जुनाच ‘शो’ : हॅरिस
“ट्रम्प यांनी कमला हॅरिस या कृष्णवर्णीय आहेत की भारतीय?” असा त्यांच्या वंशाबद्दल संशय व्यक्त केल्यानंतर ट्रम्प फूट पाडण्याचा आणि अनादराचा तोच जुना ‘शो’ करीत आहेत,” अशी टीका हॅरिस यांनी केली.
पाठिंबा वाढला
अमेरिकेतील ६० हून अधिक दक्षिण आशियाई अमेरिकी राज्ये आणि देशभरातील स्थानिक निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय स्थलांतरित आईची मुलगी या नात्याने त्या अधिक न्यायी असतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.