यंगून : म्यानमारच्या सैन्यावर (Myanmar army attack) घात लावून बसलेल्या पीपल्स डिफेन्स फोर्सने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. हा हल्ला बंडखोर सैन्याविरोधात लढणाऱया संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे. मगवे भागातील गंगाव परिसरात हा हल्ला झाला. याव डिफेन्स फोर्सने सांगितले की, त्यांच्या सदस्यांनी एका सैन्याच्या ताफ्यावर हा हलाल केला. या ताफ्यात 50 हून अधिक वाहने होती.
वायडीएफने म्यानमारचे वृत्तपत्र इरावडीला सांगितले की, त्यांनी 14 भूसुरुंगांच्या मदतीने सैन्याची वाहने उडवून दिली. सैन्याची ही वाहने गंगाव-पाले हायवेवरून जात होता. यामध्ये 40 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये एका शस्त्रास्त्रांनी भरलेल्या वाहनालादेखील उडवून देण्यात आले आहे.
विद्रोही संघटनेने लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी गंगाव-काले आणि गंगाव-हटिलिन हायवेवरून प्रवास करू नये. सैन्य आणि पीपल्स डिफेन्स फोर्समध्ये धुमश्चक्री सुरु आहे. यामुळे त्यात बळी पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर सैन्याच्या 18 वाहनांच्या ताफ्यालाही मंगळवारी सायंकाळी निशाना बनविण्यात आले. हा ताफा सगाइंग भागातून जात होता. यामुळे सैन्य़दलाने कुख्यात कमांडर लेफ्टनंट जनरल थान हलैंग यांना पीडीएफच्या खात्म्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांत विद्रोहींनी 1100 सैनिकांना ठार केले आहे. यामुळे म्यानमारने 3000 हून अधिक सैनिक मगवे आणि चीन भागात पाठविले आहेत. 1 फेब्रुवारीला म्यानमारमध्ये सैन्याने बंड पुकारत सत्ता हातात घेतली होती. त्यानंतर देशभरात हिंसाचार उफाळला होता. सैन्याने पीडीएफच्या भागातील इंटरनेट आणि फोन सेवा बंद केल्या आहेत. अनेक गावांना आग लावण्यात आली आहे.