Fifa World Cup Final : रविवारची संध्याकाळ संपूर्ण जगासाठीच फार रोमांचक होती. फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या फायनलकडेच सगळ्यांच्या नजरा होत्या. कतार मध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये सामना रंगला आणि शेवटी अर्जेंटिनाचा विजय झाला. मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले. हा क्षण अनुभवण्यासाठी भारतातूनही अनेक जण कतारमध्ये पोहोचले. यामध्ये आपले बॉलिवुड कलाकार जोरात होते.
अर्धे बॉलिवुड दिसले कतारमध्ये
शनाया कपुर, संजय कपुर, आमिर खान, करिष्मा कपूर, सुष्मिता सेन, डिनो मोरिया या अनेक बॉलिवुड कलाकारांनी फुटबॉल वर्ल्ड कप फायनलचा थरार अनुभवला. यात एक अभिमानाचा क्षण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणला वर्ल्ड कप फायनलच्या ट्रॉफीचे अनावरण करण्याचा मान मिळाला. हा समस्त भारतीयांसाठीच अभिमानाचाा क्षण होता. यावेळी रणवीर सिंग ला दीपिकाचा प्रचंड अभिमान वाटत होता. तो क्षणही रणवीर सिंगनेसोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मेस्सीचा गोल आणि दीपिकाची रणवीरला जादू की झप्पी
लिओनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते पूर्ण झाले. वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शिट्टी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले. पेनल्टी शूटआऊटमध्ये एकीकडे मेस्सीने गोल केला आणि फूटबॉलप्रेमी अक्षरश: उड्या मारायला लागले. हा सगळा थरार बघताना रणवीर सिंग काहीसा धक्क्यातच होता. तोच दीपिका ने त्याला जादू की झप्पी दिली. दोघांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Deepika Padukone : फुटबॉलशी संबंध नसताना थेट ट्रॉफीचे अनावरण; दीपिकालाच का मिळाला हा मान ?
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात विजेता झालेल्या अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. तर उपविजेत्या फ्रान्सच्या संघला 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को 206 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.