Just setting up my twitter’- ट्विटरचा सर्वेसर्वा जॅक डॉर्सीने केलेलं हे पहिलं ट्विट ! दिवस होता २१ मार्च २००६. म्हणजे कालच्या रविवारी ट्विटर पंधरा वर्षांचं झालं. सुरुवातीला फक्त १४० अक्षरांची मर्यादा असलेली ही सोशल नेटवर्किंग साइट आल्या आल्या फार लोकप्रिय ठरली होती. त्यावेळी दोन वर्षांचं असलेल्या फेसबुकचं हे धाकट भावंडं फेसबुकला गिळंकृत करू शकेल, अशी भविष्यवाणी तेव्हा अनेकांनी व्यक्त केली होती. पुढे अनेक बदल करूनही ट्विटर फेसबुकची बरोबरी करू शकलेलं नाही. २०२१ मधलं ट्विटर आणि २०१८ मधलं फेसबुक या दोघांच्या (पंधरा वर्षातल्या ) ताकदीची ही तुलना पाहा..
पंधरा वर्षांचं ट्विटर फेसबुकहून धाकलंच ! फेसबुक कुठे होतं? ट्विटर कुठे आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 5:49 AM