जगातील पाचवा सर्वांत मोठा हिरा लेसोथो लिजंड हा बेल्जियममध्ये २५९ कोटी रुपयांना विकला गेला. या हि-याचे वजन ९१० कॅरेट आहे. हा हिरा दोन गोल्फ बॉलपेक्षा मोठ्या आकाराचा असून, तो आफ्रिकेतील लेटसेंग हिºयाच्या खाणीत यंदाच्या वर्षी सापडला. आता या हिºयाला पैलू पाडून त्याची अजून विक्रमी किमतीला विक्री होईल. लुकारा डायमंड कॉर्पोरेशनला गेल्या वर्षी खाणीत सापडलेला ८१३ कॅरेट वजनाचा हिरा ४०७ कोटी रुपयांना विकला गेला होता. याच वर्षी खाणीत सापडलेला ११०९ कॅरेटचा व जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा ३४३ कोटी रुपयांना विकला गेला होता. लेटसेंग खाणीमध्ये उत्तम दर्जाचे व मोठ्या वजनाचे हिरे नेहमी सापडतात व तेथील हिºयांना विक्रमी किंमत मिळते. जेम डायमंड्स या कंपनीला खाणीत लेसोथो लिजंड हा हिरा सापडला होता. यंदाच्या वर्षी या कंपनीला १०० कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे सहा हिरे खाणीत सापडले आहेत.
जगातील सर्वात मोठ्या हि-यांच्या यादीत पाचवे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:41 AM