Fight in Plane: आतापर्यंत तुम्ही विविध कारणांमुळे विमानाची इमर्जन्सी लँडिंग केल्याच्या बातम्या ऐकल्या/वाचल्या असतील. पण, सध्या एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका उडत्या विमानात प्रवाशाने केबिन क्रूवर हल्ला केल्याचा घटना समोर आली आहे. यादरम्यान प्रवाशाने क्रु मेंबरचे बोट कापले. या घटनेदरम्यान विमानात एकच गोंधळ उडाला.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, तुर्की एअरलाइन्सचे विमान इस्तंबूलहून इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला जात होते. यावेळी विमान हवेत असताना एका प्रवाशाने क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला. प्रवासी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादाचे रुपांतर नंतर मारामारीत झाले. प्रवाशाने क्रू मेंबरला ठोसे मारण्यास सुरुवात केली. मात्र, लोकांनी त्याला कसेबसे आवरले.
विमानात गोंधळाचा व्हिडिओ
भांडणामुळे विमानाची क्वाला नामू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. मुहम्मद जॉन जॅझ बौडविजन असे या प्रवाशाचे नाव आहे. विमानतळावर पोहोचताच त्याला विमानातून उतरवण्यात आले. बौडविजन हे स्वतः इंडोनेशियन एअरलाइन्सचे पायलट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भांडणावेळी क्रु मेंबरचे बोट कापले गेले. या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.