इस्लामाबाद : पाकिस्तान वायू दलाचे लढाऊ एफ-१६ विमान कोसळल्याची दुर्घटना बुधवारी घडली. इस्लामाबादजवळील शकरपारियामध्ये पाकिस्तान डे निमित्त होणाऱ्या परेडसाठी सराव सुरू असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये पायलटचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान उड्डाण करणारे विंग कमांडर नौमन अक्रम यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये लढाऊ विमान कोसळताना दिसत आहे. तसेच, इस्लामाबाद शकरपारियांजवळील जंगलात हे विमान पडल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलाने बचावकार्य सुरु केले आहे.
अमेरिकन बनावटीचे एफ-१६ हे सर्वोत्तम लढाऊ विमान समजले जाते. पाकिस्तानला अमेरिकेकडून काही वर्षांपूर्वी हे लढाऊ विमान देण्यात आले होते. दरम्यान, या विमानाचा अपघात कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आली नाही. तसेच, याची चौकशी करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
आणखी बातम्या...
'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'
खूशखबर! येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेल 5-6 रुपयांनी होणार स्वस्त
काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व मान्यच होत नाही; ज्योतिरादित्य शिंदेंचा 'गांधीगिरी'वर निशाणा
ज्योतिरादित्य शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण...