जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील सर्फिंग स्पर्धेत उतरलेला एक स्पर्धक आॅस्ट्रेलियाचा मिक फॅनिंग चक्क शार्कच्या ताब्यात सापडला; पण बहाद्दर मिकने अंगावर आलेल्या शार्कशी दोन हात केले व तेथून सुखरूप सुटका करून घेतली. रविवारी झालेल्या या स्पर्धेचे टीव्हीवर थेट चित्रण होत होते. या थरारक प्रसंगाने प्रेक्षक घाबरून गेले, त्यात मिकची आईही होती. हा प्रसंग घडल्यानंतर ही स्पर्धा तात्काळ रोखण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील पूर्व केप प्रांतातील जेफ्री बे ही स्पर्धा होणार होती. मिक फॅनिंग आपली पाळी येण्याची वाट पाहत होता. तेव्हा शार्क मागून आला व त्याने मिकला पाण्यात ढकलून दिले. मिक बोर्डसह पाण्यात पडला. पुढच्याच क्षणी दोन कल्ले वर आले आणि मिक दिसेनासा झाला. नंतर तो वर आला; पण बोर्ड गायब होता, तो कसाबसा पाण्यात पोहत होता. अखेर मदतकर्ते जवळ आले आणि मिकची सुटका झाली. फॅनिंग सुखरूप असल्याचे पाहून लोकांच्या जिवात जीव आला. शार्कला लाथ मारलीतीनवेळा चॅम्पियन असलेल्या मिकच्या पायाजवळ काहीतरी जाणवले, त्यानंतर त्याने शार्कला पाहिले. पाण्यात पडल्यानंतर त्याने शार्कला लाथ मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या नकावर एक पंचही मारला. सुखरूप सुटून आल्यानंतर मिकने ही माहिती दिली. आईही स्पर्धा पाहत होतीही घटना घडली तेव्हा मिकची आईही स्पर्धा पाहत होती. मिकला शार्कने ढकललेले पाहिल्यानंतर त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. आमच्या कुटुंबात घडलेली ही सर्वात भीतीदायक घटना आहे, असे त्यांनी नंतर सांगितले. या घटनेनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली. (वृत्तसंस्था)
सर्फिंग स्पर्धेदरम्यान शार्कशी लढाई
By admin | Published: July 21, 2015 12:20 AM