लाहोर - जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदविरुद्ध लाहोर, गुजरंजनवाला आणि मुल्तान येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सईदसह इतर काही बड्या वक्तींविरोधात टेरर फंडींगचा आरोप करत पाकिस्तान सरकारने ही कारवाई केल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे.
हाफिज सईदने अल अन्फाल ट्रस्ट, दावत उल ईर्शाद ट्रस्ट यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशवादी कारवायांसाठी तो पैसा वापरल्याचाही आरोप हाफिजवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पाकिस्तान सरकराने कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. पाकिस्तान सरकारच्या या कारवाईमुळे दहशवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तान सरकार कठोर निर्णय घेत असल्याचं दिसून येत आहे.