ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 19 - गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रिकरण करण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण चक्क पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधून बागेत सेक्स करत असलेल्या जोडप्याचे चित्रिकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी दक्षिण यॉर्कशायरमधील दोन पोलिस अधिकारी आणि दोन पायलटांविरोधात शेफिल्ड येथील क्राऊन कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.
एक जोडपे विवस्त्रावस्थेत बागेत सेक्स करत होते. त्यावेळी पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांचे चित्रिकरण करण्यात आले होते, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. या प्रकरणी मॅथ्यू लुकास, ली वॉल्स, मॅथ्यू लुसेमोर आणि माल्कम रीव्ह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र या आरोपींनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी अॅड्रियन पोगमोरे याने मात्र आपल्यावरील आरोप मान्य केले असून सरकारी मालमत्तेचा दुरुपयोद झाल्याचे कबूल केले आहे.
आणखी वाचा
(सेक्स चेंज ऑपरेशन करुन घेणा-यांची वाढली संख्या )(पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश )(बॉलिवूड दिग्दर्शिकेची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये ? )चित्रित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संबंधित जोडपे आपल्याच धुंदीत असल्याचे दिसत आहे. हे चित्रिकरण करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या चालक दलातील सदस्यांनी उच्च क्षमतेच्या व्हीडिओ कॅमेऱ्याचा वापर केल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी रिचर्ड राइट यांनी सांगितले. तसेच हे कृत्य म्हणजे व्यक्तीच्या प्रायव्हसीचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेनेसुद्धा या घटनेमुळे आपल्या खासगी आयुष्याच्या स्वातंत्र्याचे उघड उल्लंघन झाले असून, या प्रकारामुळे आपण दु:खी असल्याचे सांगितले.
2012 मध्येसुद्धा याप्रकारचे चित्रिकरण करून चित्रफिती बनवण्यात आल्या होत्या. आता न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून येत्या तीन आठवडे सुनावणी सुरू राहण्याची शक्यता आहे.