पॅरिस : फ्रान्सचे सर्वात तरुण अध्यक्ष बनण्याची संधी एम्मॅन्युएल मॅक्रोन (३९) यांना मिळेल अशी चिन्हे रविवारी झालेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर दिसत असून, सोमवारी त्याचा दुसरा व अंतिम टप्पा झाला. सात मे रोजी निकाल जाहीर होईल.मॅक्रोन हे युरोपच्या बाजूने असून, मरीन ली पे (४८) या स्थलांतराच्या विरोधातील आहेत. या मतदानाने देशाच्या पारंपरिक वर्गाला मोठा धक्का दिला आहे. रविवारच्या मतदानात मॅक्रोन यांना २३.७५ टक्के, तर नॅशनल फ्रंटच्या मरीन ली पेन यांना २१.५३ टक्के मते मिळाली. पाठिराख्यांसमोर भाषण करताना मॅक्रोन म्हणाले की, ‘‘मी देशभक्तांना एकत्र करण्याचे ध्येय ठरवले आहे.’’
फ्रान्समध्ये अंतिम टप्प्याचे मतदान
By admin | Published: April 25, 2017 12:54 AM