शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

अखेर अमेरिकेकडून भारतासह आठ देशांना इराणचे तेल घेण्याची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 5:24 AM

किमती भडकू न देण्यासाठी केली तडजोड

नवी दिल्ली : इराणविरोधात ५ नोव्हेंबरपासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधांतही भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. अमेरिकेेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण कोंडी करण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत. इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता.इराणकडील तेलखरेदी बंद केल्यास जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकतील. त्यामुळे तडजोडीचा मार्ग म्हणून ट्रम्प प्रशासनाने आठ देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली आहे. भारतासह जपान व दक्षिण कोरिया यांचा या देशांत समावेश आहे. चीन हा इराणी तेलाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. चीनला तेल आयातीची सवलत मिळाली असली तरी अटींच्या मुद्यावर दोन्ही देशांत अजून चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. इतर चार देश कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ही सवलत तात्पुरती असणार आहे.भारताकडून इराणी तेल आयातीत ३0% कपातदरम्यान, भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३0 टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात आली. त्याच आधारावर अमेरिकेने भारताला निर्बंधांतून सवलत दिली आहे. रिलायन्ससारख्या काही कंपन्यांनी इराणचे तेल खरेदी करणे आधीच थांबविले आहे. एस्सार-नायरा ही खाजगी कंपनी मात्र स्पॉट मार्केटमधून अजून इराणी तेल उचलत आहे.

टॅग्स :Crude Oilखनिज तेलUSअमेरिकाIranइराणIndiaभारत