शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

अबब...! कोरोना नियम मोडल्यास तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड, 'या' देशाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 1:03 PM

Saudi Arabia Corona: सौदीने प्रवासासंबंधी लावलेले नियम मोडल्यास दंडात्कम कारवाई केली जाईल.

ठळक मुद्देसौदी अरबच्या रेड लिस्टमध्ये भारताचेही नाव आहे.

रियाद: अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सौदी अरब (Saudi Arabia) सरकार कोरोना नियमांबाबत अतिशय कठोर झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासावर लावलेल्या नियमांना अजून कठोर करत दंडाची रक्कमही वाढवली आहे. यापूर्वी सरकारने नियमांचे पालन न केल्यास 3 वर्षांचा ट्रॅव्हल बॅन लावण्याची घोषणा केली होती. 

‘अरब न्यूज’च्या रिपोर्टनुसार, सौदी सार्वजनिक अभियोजन कार्यालय (Saudi Public Prosecution Office) ने प्रवासासंबंधी दिलेले नियम मोडल्यास मोठा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दंडाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सरकारी आदेशानुसार, कोरोनाची दुसरी लाट आलेल्या देशांचा प्रवास केल्यावर संबंधित व्यक्तीला 133,323 डॉलर म्हणजेच तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल.

रेड लिस्टमध्ये भारताचे नावदरम्यान, सौदी अरबने यापूर्वीच रेड लिस्टमध्ये सामील देशांचा प्रवास केल्यावर तीन वर्षांचा ट्रॅव्हल बॅन लावण्याचा आदेश जारी केला होता, तर आता दंडाची रक्कमही वाढवली आहे. सौदी अरबने आपल्या रेड लिस्टमध्ये भारत, पाकिस्‍तान, संयुक्‍त अरब अमीरात इत्यादी देशांना ठेवले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या देशांना रेड लिस्टमधून काढण्यात येईल, असेही सौदी सरकारने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत