फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादाला तोंड फुटले होते. फिनलँडमधील विरोधी नेत्यांनी व्हिडीओवरून पंतप्रधान सना मरिन यांना घेरण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर पंतप्रधानांची ड्रग्स टेस्ट करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. यानंतर सना मरिन यांनी ड्रग्स घेतल्याचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्यांनी पार्टीमध्ये केवळ मद्यप्राशन केल्याचेही सांगितले होते. परंतु वाढता वाद पाहून त्यांनी स्वखर्चाने ड्रग्स टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे.
फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी गेल्या शुक्रवारी ड्रग टेस्ट केली होती. परंतु त्यापूर्वी त्यांनी पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेतले नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतरही वाढता वाद पाहता त्यांनी आपली ड्रग टेस्ट केली होती. फिनलँड सरकारकडून जारी करम्यात आलेल्या निवेदनात पंतप्रधानांच्या केलेल्या चाचणीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी स्वखर्चाने ही चाचणी केले असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
व्हायरल झाला होता व्हिडीओसोशल मीडियावर सना मरीन यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रियाही आल्या होत्या.