राजधानी दिल्लीत सध्या छोट्याशा युरोपीयन देशातील शिक्षणव्यवस्थेची चांगलीच चर्चा होत आहे. बर्फाने वेढलेला फिनलँड हा देश सध्या तेथील एज्युकेशन सिस्टीममुळे जगभरात चर्चेत आहेत. दिल्लीतील शिक्षकांना येथे ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येत आहे. मग, येथील शिक्षणपद्धती नेमकी कशामुळे चर्चेत आहे, याची माहिती घेऊयात.
फिनलँडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण इंटरेस्टींग बनवण्यासाठी अनेक सवलती दिल्या जातात. दिल्ली विश्वविद्यालयाच्या शिक्षण विभागातील प्राध्यापिका प्रो हनीत गांधी म्हणतात की, जवळपास १० वर्षांपूर्वीच फिनलँडमधील एज्युकेशन सिस्टीमची जगभरात चर्चा होती. विद्यार्थ्यांना भोकमपट्टी न करता, कन्सेप्ट समजवण्यावर तेथे भर दिला जातो. विषय समजून सांगण्यासाठी अगोदर संकल्पना काय आहे हे माहिती दिली जाते, तसेच हा विषय समजण्याची गरज का आहे, हे विस्तृत उदाहरणांसह समजावले जाते.
येथील विद्यार्थ्यांना समजा इतिहास समजावून सांगायचा आहे, तर सन सनावळी तारखा यांपेक्षा ऐतिहासिक घटनांचा घटनाक्रम पद्धतीने ते समजावून सांगितले जाते. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ते अधिक आवडू लागते, ते स्वत;हून आवडीने तो विषय समजून घेण्यासाठी आग्रही बनतात, असे गांधी यांनी सांगितले. तेथील विद्यार्थ्यांना नापास होण्याची किंवा घरुन होमवर्क करण्याची भीती नसते. कारण, हे दोन्ही प्रकार तेथील शिक्षणपद्धतीत नाहीत. येथे वयाच्या ७ व्या वर्षांपासून शिक्षण सुरु केले जाते, अशा अनेक सोयी विद्यार्थ्यांना दिल्या जातात.
विद्यार्थ्यांसाठी हे ७ कारणे, सोयी
नो डिटेंशन म्हणजे नापास होण्याची भीती नाहीमहिन्याला कुठलीही चाचणी परीक्षा नाही, पहिली परीक्षा हायस्कूलमध्येच होतेशाळेतील विद्यार्थी किंवा प्रादेशिक विभागातून कॉम्पीटीशन रँकींग नाहीप्रत्येक सेशन क्लासनंतर १५ मिनिटे विद्यार्थ्यांना प्ले टाइम मिळतो.कमीत कमी होमवर्कलहान मुलांसाठी प्री स्कूल एकदम फ्री
शिक्षकांसाठी काय आहे विशेष
शिक्षकांना ऑन द जॉब ट्रेनिंग दिले जातेटिचिंग प्रोफेशनल्ससाठी देशातील टॉप १० ग्रॅज्युएटचीच निवड केली जातेशिक्षकांच्या वेगवेगळ्या संन्सेप्टवर सहकारी शिक्षक आपापसात सल्लामसलत करतात. फिनलँडमध्ये शिक्षकांचे पगारही सर्वाधिक आहेत. टीचर एजुकेशन इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश हे विद्यार्थ्यांचे स्वप्न
प्रशासन पातळीवर
शिक्षणपद्धती पूर्णपणे डी सेंट्रलाईज आहेइन्स्पेक्शनचा कुठलाही नियम नाही, संपूर्ण जबाददारी शिक्षकांचीचगणित, विज्ञानसह संगीत, आर्ट, खेळ, रिलीजन, हँडक्राफ्ट आणि टेक्स्टाईलही शिकवण्यात येतेतिसरी इयत्तेपासून इंग्रजी बंधनकारक आहे.