आयुष्यात कधी-कधी अशी परिस्थिती येते की, कोणताही व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी कुठलाही धोका पत्करायला तयार होतो. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. घराला आग लागल्यानंतर एका बहिणीने स्वतःचा जीव धोक्यात घालून लहान भावाला वाचवल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. ही आग लागली तेव्हा घरात 18 वर्षांची मुलगी आणि तिचा 13 वर्षांचा भाऊ होते. चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीमुळे त्या दोघांना घराच्या बाहेर पडणे अशक्य होते. यादरम्यान बहिणीने एक युक्ती केली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून भावाला वाचवले.
अग्निशमन विभागाने खाली उतरवले
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील ईस्ट व्हिलेज परिसरात अव्हेन्यू डी येथे आग लागली. सकाळी 7.15 वाजता आग लागली तेव्हा मुलगी खिडकीबाहेर एका पाईपला लटकली. यानंतर तिने आपल्या भावालाही खिडकीबाहेर बोलावले आणि त्यालाही पाईपला धरुन उभे केले. यादरम्यान एका व्यक्तीने आपल्या मोबाईलने याचा व्हिडिओ शूट केला. यावेळी घरातील आगीची तीव्रहाती खूप वाढली, पण बहिणीने आपल्या भावाला काही होऊ दिले नाही. अखेर अग्नीशमन दलाने त्या दोघांना खाली घेतले.
बॅटरीमुळे घराला आग लागली
न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाने सांगितले की, या आगीत इमारतीमधील एकाचा मृत्यू झाला आहे. इलेक्ट्रिक बाइकच्या शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे विभागाचे म्हणणे आहे. पाइपवरून खाली आल्याने हे दोघे भाऊ-बहीण किरकोळ जखमी झाले आहेत. पण, सुदैवाने त्यांचा जीव वाचला.