लास वेगास - अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून किमान 500 जण जखमी असल्याची माहिती आहे, अनेकजण गंभीर जखमी आहेत.
जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून हा गोळीबार सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे कॅसिनोजवळ झाला. एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही मँडले बे कॅसिनोच्या परिसरात हल्लेखोराचा शोध घेत आहोत. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे ट्विट लास व्हेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडले बे कसीनोच्या वरच्या मजल्यावर अचानक गोळीबाराला सुरूवात झाली. या कसीनोच्या जवळच एक म्युझिक फेस्टिव्हल सुरू होता त्यामुळे येथे लोकांची मोठी गर्दी होती. स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला.
अचानक गोळीबाराला सुरूवात झाल्याने गोंधळ उडाला आणि जीव मुठीत धरून लोकांनी पळायला सुरूवात केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला आहे.
हा दहशतवादी हल्ला आहे की अन्य कारण आहे याबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. एका हल्लेखोराचा पोलिसांनी खात्मा केल्याची माहिती आहे. पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला आहे. (फोटो क्रेडिट - GETTY IMAGES)