नायजर: दक्षिण-पश्चिम नायजरमधील एका गावात अज्ञात हल्लेखोरांनी बेच्छुट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 14 मुलांसह 37 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नायजरच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. दरम्यान, 2021 वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत या भागातील 400 पेक्षा जास्त नागरिकांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
शेतात काम करणाऱ्या लोकांवर गोळीबारमिळालेल्या माहितीनुसार, नायजरच्या सीमेवर असलेल्या माळीच्या सीमेजवळील तिलबेरी भागातील बाणीबांगोच्या कम्यूनमध्ये सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. एका स्थानिक अधिकाऱ्याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितल्यानुसार, सोमवारी दुपारी लोक शेतात काम करत असताना, हल्लेखोर मोटारसायकलवरून डेरे-दे गावात आले. यावेळी शेतात काम करणाऱ्या लोकांवर त्यांनी बेच्छुट गोळीबार सुरू केला.
राज्यांनी ठरवलं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
किमान 420 नागरिकांचा मृत्यूह्यूमन राइट्स वॉचने (एचआरडब्ल्यू) गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यावर्षी तिलबेरी आणि ताहोआच्या शेजारील भागात 2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या जिहादी हल्ल्यांमध्ये किमान 420 नागरिक मारले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय हक्क गटाचे संचालक कोरिन दुफका यांनी अहवालात म्हटल्यानुसार, या हल्ल्यामागे सशस्त्र इस्लामवादी गटाचा हात आहे.
तालिबानकडून अफगाणी नागरिकांवर चाबूक आणि धारदार शस्त्रांनी हल्ला
मोठ्या दहशतवादी संघटनांचा सहभागनायजर, बुर्किना फासो आणि माली दरम्यान असलेल्या आदिवासी भागात कार्यरत असलेले दहशतवादी बहुतांशी अल कायदा किंवा इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित आहेत. अधिकाऱ्यांनी सुरक्षा वाढवल्यानंतरही या भागात असेच हल्ले अनेक वेळा झाले आहेत.