ऑनलाइन लोकमत
मनीला, दि. 2- फिलीपीन्समधील एका कसिनोमध्ये शस्त्रधारी माणसाने धुमाकूळ घातला होता. यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे तर 54 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे मनीला कसिनोमध्ये एक शस्त्रधारी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आत गेला होता. कसिनोच्या आतमध्ये गेल्यावर त्याने टेलिव्हीजीन स्क्रीनवर गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारामुळे कसिनोमध्ये आग लागली होती. मनीला कसिनोमध्ये रात्रीच्या वेळेत बरीच लोक हजर होती. जास्त लोकांना मृत्यू धुरामुळे गुदमरून झाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये सापडला आहे. हल्लेखोराने स्वतःला ब्लॅन्केटमध्ये गुंडाळलं आणि त्या ब्लॅन्केटरवर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतल्याची माहिती पोलिस अधिकारी डेला रोसा यांनी दिली आहे. मनीला कसिनोमध्ये झालेला हल्ला दहशतवादी हल्ला नाही, कसिनोमधील ग्रीन तीप चोरी करण्यासाठी एक शस्त्रधारी व्यक्ती आला होता त्याने हल्ला घडवून आणला, अशी माहितीही डेला रोसा यांनी दिली आहे. या हल्ल्यामध्ये 54 जण जखमी झाली आहेत, त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. "कसिनोमध्ये हल्ला करणारा हल्लेखोर मूळचा युरोपीयन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोर इंग्लिशमध्ये बोलत होता तसंच तो उच्च आणि गोरा होता. कदाचित तो विदेशी असू शकतो", अशी शक्यता मनीला पोलिस प्रमुख ऑस्कर अल्बयाल्डे यांनी वर्तवली आहे.
हल्ल्यानंतर कसिनोजवळच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे तसंच घटनेची पुढील तपासणी सुरू झाली आहे. त्यावेळी कसिनोमध्ये असलेल्या लोकांनी चेहऱ्याला कपडा बांधलेल्या एका व्यक्तीला आत येताना पाहिलं होतं. आत येताच त्या व्यक्तीने गोळ्या झाडायला सुरूवात केली.
मनीला कसिनोच्या मालकांनी या हल्ल्याबद्दलची अधिकृत माहिती ट्विटकरून दिली आहे. कसिनोमध्ये झालेल्या हल्ल्यात कसिनोतील 35 जणांचा मृत्यू झाला आहे तसंच त्या हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे तर 54 जण जखमी झाली आहेत.
रिसॉर्ट वर्ल्ड मनीलाला आरडब्ल्यूएम म्हणूनही ओळखलं जातं. न्यू पोर्ट सिटीमध्ये हा रिसॉर्ट आहे.
A help desk has been set up at Career Hub 1, G/F NECC building. You may reach us at these hotline numbers: 0917-8728300 and 0917-8728756. pic.twitter.com/BVKtrOc8JT— Resorts World Manila (@rwmanila) June 2, 2017