ऑनलाइन लोकमत
जर्मनी, दि. २३ - वेस्टर्न जर्मनी परिसरात असलेल्या सिनेमा कॉम्पेक्समध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केल्याचे वृत्त येथील स्थानिक दैनिकाने दिले आहे.
वेस्टर्न जर्मनी येथील सिनेमा कॉम्पेक्समध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने स्वत:च सिनेमा कॉम्पेक्सचे बॅरीकेड तोडून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २० ते ५० जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून गोळीबार करणा-या व्यक्तीला ठार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.