शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पॅरिसमध्ये पुन्हा गोळीबार

By admin | Published: January 09, 2015 2:25 AM

बुधवारी चार्ली हेब्डो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये शोक दिन पाळला जात असतानाच गुरुवारी नव्याने झालेल्या गोळीबाराने पॅरिस शहर पुन्हा हादरले.

पॅरिस : बुधवारी चार्ली हेब्डो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये शोक दिन पाळला जात असतानाच गुरुवारी नव्याने झालेल्या गोळीबाराने पॅरिस शहर पुन्हा हादरले. शहराबाहेरच्या परिसरात सशस्त्र हल्लेखोराने स्वयंचलित रायफलीतून केलेल्या गोळीबारात एक महिला पोलीस अधिकारी ठार झाली तर एक नागरिक गंभीर जखमी झाला. हा हल्लेखोर फरार झाला आहे. पॅरिस पोलिसांच्या मते बुधवारी व गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा काहीही परस्पर संबंध नाही. चार्ली हेब्डो साप्ताहिकावर बुधवारी झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा बळी गेल्यानंतर फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटली. शिवाय पूर्व फ्रान्समधील एका गावात कबाबच्या दुकानात स्फोट झाला; पण त्यात कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी साप्ताहिकाच्या कार्यालयात झालेल्या हल्ल्याप्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. चार्ली हेब्दो साप्ताहिकाच्या कार्यालयातील हत्याकांडामुळे संपूर्ण

देश स्तब्ध झाला आहे, तसेच जगातील विविध देशातील लोक या हल्ल्याच्या विरोधात मोर्चे काढत आहेत. फ्रान्समधील विविध निषेध मोर्चात १ लाख लोक रस्त्यावर आले. रशियापासून अमेरिकेपर्यंत जगातील अनेक देशात हजारो लोकांनी आय अ‍ॅम चार्ली असे लिहिलेले फलक हातात घेऊन मोर्चे काढले व माध्यम स्वातंत्र्याचा तसेच वादग्रस्त चालीर् हेब्दो साप्ताहिकाला समर्थन दिले. 

राष्ट्रीय शोकदिन फ्रान्समधील या हल्ल्यानंतर गुरुवारी राष्ट्रीय शोकदिन जाहीर करण्यात आला. गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात फ्रान्समध्ये राष्ट्रीय शोकदिन पाळण्याची ही पाचवी वेळ आहे.हल्लेखोर आरोपी चेरीफ कौची (३२) व त्याचा भाऊ सईद (३४) हे मुख्य बुधवारच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी असून, त्यांच्या नावे अटक वॉरंट काढण्यात आली आहेत. या दोघांचाही जन्म फ्रान्समध्ये झाला असून चेरीफवर २००८ साली इराकमध्ये जिहादी पाठविण्यासाठी नेटवर्क उभारल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांचा साथीदार व संशयित आरोपी हमीद मौराद (१८) याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याचे नाव प्रसार माध्यमात आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. शोकदिन