२०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अद्याप राजकीय पेच सुरूच आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेतील ट्रम्प समर्थकांमुळे २०० वर्षांनंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. असाच एक हल्ला इंग्रजांनी अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीवर केला होता. त्यावेळी घुसखोरांनीी वॉशिंग्टनमध्ये जाळपोळही केली होती. तसंच त्यांच्याकडून संसदेच्या इमारतीला नुकसान पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता.सुरूवातीच्या काळात स्वातंत्र्यानंतर अमेरिका सावरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु १८१२ मध्ये ब्रिटनसोबत अमेरिकेचं युद्ध सुरू झालं. त्यावेळी ब्रिटननं अमेरिकेला आपली ताकद दाखवून दिली होती. हे सर्व सुरू असताना १८१४ मध्ये अशी एक वेळ आली जेव्हा ब्रिटनच्या काही घुसखोरांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. २४ ऑगस्ट १८१४ रोजी ब्रिटनच्या घुसखोरांनी वॉशिंग्टनच्या दिशेनं कुच केली. ज्यावेळी ते वॉशिंग्टनमध्ये आले त्यावेळी त्यांची नजर अमेरिकेच्या या संसदेच्य इमरातीवर गेली. त्यानंतर त्या घुसखोरांनी या इमारतीतील लाकडी वस्तूंना आग लावण्यास सुरूवात केली. नंतर ही हा आग संपूर्ण इमारतीत पसरली. कॅपिटल हिलला आग लावल्यानंतर घुसखोरांनी व्हाईट हाऊसच्या दिशेने कुच केली आणि राष्ट्राध्यक्षांच्या इमारतीवर हल्ला केला. १८ जून १८१२ रोजी अमेरिका आणि ब्रिटनदरम्यान सुरू झालेलं हे युद्ध तीन वर्ष चाललं. दोन्ही देशांमधील हे युद्ध १८१५ मध्ये संपलं. ज्यावेळी कोणताही तोडगा निघाला नाही त्यावेळी दोन्ही देशांकडून कराराद्वारे युद्ध समाप्तीची घोषणा करण्यात आली होती.आता काय झालं?डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केलं आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावं आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावं," असं जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाहीत. कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असं जो बायडेन यांनी सांगितले.हिंसाचारात एका महिलेचा मृत्यू, अनेक जण जखमीनिवडणुकीच्या निकालाबाबत अमेरिकेच्या संसदेच्या बोलावलेल्या बैठकीपूर्वी ट्रम्प समर्थकांची गर्दी व्हाइट हाऊस आणि अमेरिकन कॅपिटल इमारतीच्या बाहेर जमा झाली होती. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्येही गोंधळ केला. यावेळी पोलीस आणि सर्मथकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रॉयटर्सनं दिलेल्याच्या वृत्तानुसार, या हिंसाचारात एका महिलेचा गोळीबारात मृत्यू झाला. "एका महिलेला गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला. तर या हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले," अशी माहिती वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी दिली.
१८१४ नंतर अमेरिकेच्या संसदेवर हल्ल्याची ही पहिली घटना, त्यावेळी ब्रिटननं हल्ल्यात जाळली होती इमारत
By जयदीप दाभोळकर | Published: January 07, 2021 11:26 AM
१८१२ पासून तीन वर्ष सुरू होतं अमेरिकेचं ब्रिटनसोबत युद्ध
ठळक मुद्देट्रम्प समर्थकांकडून २०० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्तीसंसद इमारतीत झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी