स्टॉकहोम : जन्मत:च गर्भाशय नसणो किंवा शारीरिक दोषामुळे अपत्य सुखापासून आयुष्यभर वंचित राहणा:यांसाठी नवीन वैद्यकीय तंत्रशास्त्र वरदान ठरत आहे. सरोगेसी, आयव्हीएफ यासारख्या जीवशास्त्रीय तंत्रने अनेकांना अपत्य सुख लाभले आहे. यापुढेही मजल मारत वैद्यकीयशास्त्रने जन्मत:च गर्भाशय नसलेल्या महिलेच्या पोटी बाळाला जन्म देण्याची किमया केली आहे. 36 वर्षाच्या महिलेत प्रत्यारोपित करण्यात आलेल्या गर्भाशयातून जन्माला आलेले हे जगातील पहिले बाळ होय.
सप्टेंबरमध्ये जन्माला आलेल्या या बाळाचे (मुलगा) वजन 1 किलो 8क्क् ग्रॅम असून बाळाचे आई- वडील बाळाच्या जन्माने अतिशय सुखावले आहेत. स्वीडनच्या या 36 वर्षीय महिलेला जन्मत:च गर्भाशय नव्हते. स्वत:चे अपत्य हवे असेल तर सरोगेसीशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
तिच्या मैत्रिणीने (वय 61) तिला आपले गर्भाशय दान करण्याची तयारी दाखविल्यानंतर या जोडप्याच्या संमतीनुसार आयव्हीएफ तंत्रनुसार डॉक्टरांनी 11 गर्भ तयार केले. त्यानंतर ते प्रयोगशाळेत गोठवून ठेवण्यात आले. त्यानंतर सुरू झाली गर्भाशय प्रत्यारोपणाची प्रक्रिया. गर्भाशयाचे प्रत्यारोपण यशस्वी व्हावे म्हणून औषधोपचार करण्यात आले. सुदैवाने हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. वर्षभरानंतर डॉक्टरांनी एक गर्भ (भ्रूण) प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वसामान्य महिलेप्रमाणो ती गर्भवती राहिली. 32 आठवडे पूर्ण झाल्यानंतर या महिलेच्या गर्भाशयात विषबाधा निर्माण झाली. परिणामी, बाळाच्या हृदयाची गती कमी-अधिक होऊ लागल्याने युनिव्हर्सिटी ऑफ गॉथेनबर्गच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसूतीचा निर्णय घेतला. या डॉक्टरांच्या यशाची दखल ‘द लान्सेट’ या ब्रिटिश मेडिकल जर्नलने घेतली आहे. (वृत्तसंस्था)
च्यापूर्वीही दोन वैद्यकीय पथकांनी गर्भाशय प्रत्यारोपणाचा प्रयत्न केला. एका प्रकरणात रोगग्रस्त झाल्याने प्रत्यारोपणानंतर तीन महिन्यांनी गर्भाशय काढावे लागले. गर्भाशयाचा दुसरा प्रयत्नही गर्भपातामुळे अपयशी ठरला.
च्प्रत्यारोपित गर्भाशयाद्वारे बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न यशस्वी होणो, हा आमच्यासाठी आनंदाची पर्वणीच आहे, असे प्रत्यारोपण पथकाचे प्रमुख प्रो. मॅट्स ब्रॅन्स्ट्रॉम यांनी म्हटले आहे.
च्दहा वर्षापासूनचे आमचे प्राण्यावरील संशोधन आणि विशेष शस्त्रक्रिया प्रशिक्षणासह घेतलेल्या अथक परिश्रमामुळे जगभरातील अशा अभागी महिलांवर अशापद्धतीने उपचार करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, असेही ते म्हणाले.
च्अपत्य सुखाची आशा सोडलेल्या दाम्पत्यांसाठी यामुळे आशेचा नवा किरण मिळाला आहे, असे या पथकातील स्त्रीरोग शल्यचिकित्सक लिझा जॉन्सन यांनी सांगितले.
च्स्वत:चे अपत्य असावे यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे केलेला प्रवास खूपच खडतर होता. पण त्याची फलश्रुती म्हणून आता आम्हाला सर्वात अद्भूत बाळ लाभले आहे. ते खूप म्हणजे खूपच ‘क्युट’ आहे. खरे तर वरकरणी पाहता आमचे बाळ इतर बाळांसारखेच आहे. पण त्याच्या जन्माची कथा मात्र नक्कीच अनोखी आहे.
-अद्भूत बाळाचे वडील