इराणनंतर आता इराकच्या सैन्य तळांवर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर शनिवारी इस्रायलने निवेदनही जारी केले. यात, आपला या हल्ल्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. मात्र सर्वांचा संशय इस्रायलवरच आहे.
इस्रायलवर संशय -इस्रायलने शुक्रवारी (19 एप्रिल) इराणवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी इराणने केलेल्या ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला करण्यात आला. यामुळेच आता इराकमधील लष्करी तळावरील हल्ल्यामागेही इस्रायलचाच हात असल्याचे बोलले जात आहे.
इस्रायलने हल्ला केलाच असेल तर, असा हेतूही असू शकतो -इराक हा इराणच्या अगदी जवळ आहे. याशिवाय, पीएमएफचेही इराणी लष्कराशी घनिष्ठ संबंध आहेत, यामुळे हा हल्ला मेसेज देण्यासाठीही असू शकतो. महत्वाचे म्हणजे, इस्त्रायलचा इरादा असाही असू शकतो की, जर इराक आणि इराण या दोन्ही देशांवर हल्ला केला तर सर्वांनाच इस्रायलच्या शक्तीचा अंदा येईल आणि ते इस्रायलसोबत युद्धाचा विचारही करणार नाही. यामुळेच इस्रायल कुणावरही हल्ला करायला भीत नाही.
19 एप्रिलला झाला होता हल्ला -इराकच्या 'पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स'ने (पीएमएफ) म्हटल्यानुसार, शुक्रवारी (19 एप्रिल) रात्री त्यांच्या काल्सो मिलिटरी बेसच्या कमांड पोस्टवर मोठा स्फोट झाला. काल्सो मिलिटरी बेस बगदादपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. येथे हवाई हल्ला झाल्याचे संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात एका पीएमएफ फायटरचा मृत्यू झाला आहे, तर सहा सैनिक जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांना हिल्ला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.