एका रेपिस्टची 'भूक'च त्याला पकडून देण्यात फायदेशीर ठरली. रेपिस्टने फूड डिलीवरी अॅपच्या माध्यमातून कबाबची ऑर्डर दिली होती आणि पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जराही वेळ न घालवता घटनास्थळ गाठलं आणि त्याला ताब्यात घेतलं. जगातली ही अशाप्रकारची केस असेल ज्यात एका डिलीवरी अॅपमुळे एक आरोपी पकडला गेला. ही घटना लंडनमधील आहे.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, आरोपी ४३ वर्षीय डेनिअल हसन आणि पीडितेची गेल्यावर्षी मे महिन्यात डेटिंग साइटवर भेट झाली होती. त्यानंतर दोघेही पहिल्यांदा इंग्लंडच्या न्यूकॅसल सिटी सेंटरमध्ये भेटले. ठरलं होतं की दोघेही चॅम्पियन्स लीगची फायनल मॅच बघतील. हसन फायनल बघण्यासाठी महिलेच्या घरी पोहोचला होता. यादरम्यान त्याचा महिलेसोबत वाद झाला. आरोपीने आधी पीडितेला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर रेप केला. मग फरार झाला.
महिलेने हसनच्या आवडत्या टिमबाबत असं काही वक्तव्य केलं की, तो नाराज झाला. त्याने रेप करण्याआधी महिलेला मारहाण केली. महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती आरोपीला केवळ डॅनी नावाने ओळखत होती आणि तो मॅनचेस्टरचा राहणारा होता. घटनेनंतर हसनने डेटिंग साइटवरून आपला फोटो काढला. मात्र, पोलिसांनी तो रिकव्हर केला.
चौकशीतून समोर आलं की, आरोपी Hauxley, County Durham मध्ये कुठेतरी लपला आहे. पण त्याचं नेमकं लोकेशन माहीत नव्हतं. पोलीस त्याचा शोध घेत होते तेव्हाच त्याने एका फूड डिलीवरी अॅपवरून आरोपीच्या लोकेशनबाबत माहिती मिळाली. हसनने त्याच्यासाठी कबाब ऑर्डर केलं होतं. ज्याच्या आधारे पोलीस त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला पकडलं. ब्रिटिश पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी हायटेक टेक्नीकचा वापर करतात.