नवी दिल्लीः गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एका विद्यापीठाच्या व्हर्चुअल पदवीदान समारंभाला संबोधित करताना आपल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी जायचे होते. त्यासाठी अमेरिका प्रवासात केवळ माझ्या विमानाच्या तिकीटावर वडिलांना आपल्या वर्षभराची सर्व कमाई खर्च करावी लागली होती, असे सुंदर पिचई यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे २०२०च्या पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांचा विशेष पदवीदान समारंभ आयोजित करता येत नाही. त्यामुळे त्यांना व्हर्चुअल पदवीदान करण्यात येत आहे. यावेळी या समारंभात 'Be open, be impatient, be hopeful' (मन मोकळे राहा, अधीर व्हा, आशावादी व्हा') असा संदेश सुंदर पिचई यांनी विद्यार्थ्यांना दिला. याचबरोबर, आपल्या भाषणात सुंदर पिचई यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी जायचे होते. या अमेरिका प्रवासात केवळ माझ्या विमानाच्या तिकीटावर वडिलांना आपल्या वर्षभराची सर्व कमाई खर्च करावी लागली होती.
अमेरिकेचा प्रवास हा माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता. अमेरिका खूप महाग होते. घरी फोन करण्यासाठी मला एक मिनिटासाठी 2 डॉलर खर्च करावा लागला. त्यावेळी एका बॅगची किंमत माझ्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराइतकी होती, असे सुंदर पिचई यांनी सांगितले. माझ्याकडे कुठलीही टेक्नोलॉजी नव्हती. मी 10 वर्षाचा होईपर्यंत आमच्या घरात एक टेलिफोन सुद्धा नव्हते. मी अमेरिकेत येईपर्यंत माझ्याकडे कॅम्प्युटरचा नियमित वापर नव्हता. ज्यावेळी आमच्याकडे प्रथमच टीव्ही आला, त्यावेळी त्या टीव्हीमध्ये फक्त एकच चॅनेल दिसत होता, असेही सुंदर पिचई यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, सुंदर पिचई ज्या व्हर्चुअल पदवीदान समारंभात सामील झाले. त्या समारंभात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल सुद्धा उपस्थित होते. तसेच, ऑनलाइन सहभागी झालेल्यांमध्ये सिंगर लेडी गागा आणि नोबेल विजेती मलाला युसूफझाई यांचा देखील समावेश होता. दरम्यान, सुंदर पिचई यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला. चेन्नईमधून त्यांनी आयआयटीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. 2004 मध्ये त्यांनी गुगलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.
आणखी बातम्या...
पॉर्न साइट्सवर विकायचा प्रेयसीचे अश्लील फोटो; एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजरला अटक
"भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही?"
CoronaVirus News : 'हा' देश झाला कोरोनामुक्त, पंतप्रधानांनी केला डान्स!
सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी कोरोना नियम मोडले, तर बॉसला होणार तुरुंगवास!