शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

सौदीमध्ये प्रथमच महिलांचे मतदान

By admin | Published: December 13, 2015 2:04 AM

महिलांशी प्रचंड भेदाभेद करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात शनिवारी प्रथमच महिलांनी मतदान केले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणूनही महिला भविष्य

रियाध : महिलांशी प्रचंड भेदाभेद करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात शनिवारी प्रथमच महिलांनी मतदान केले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणूनही महिला भविष्य अजमावत आहेत. त्यांना निवडणुकीत उभे राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.महिलांबाबत हा देश अत्यंत कर्मठ असून, निवडणुकीत मतदान करू देण्याची आणि उमेदवार म्हणून उभे राहण्याची परवानगी म्हणजे महिलांवरील सामाजिक निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल समजले जात आहे.सौदी अरेबियात फक्त पालिकांसाठी निवडणूक घेतली जाते. केवळ पालिकांमध्येच निर्वाचित सदस्य असतात. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना उभे राहण्याची आणि त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती. या देशात राजेशाही असून, महिलांना सक्तीने बुरखा परिधान करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना वाहन चालविण्यास बंदी आहे. निवडणुकीतही फक्त पुरुषांनाच मतदान करण्याची परवानगी होती. यामुळे सौदी सरकारचे हे पाऊल क्रांतिकारक समजले जात आहे. या निवडणुकीच्या रिंगणात ६ हजार पुरुष आणि ९०० महिला उमेदवार आहेत. मोफत टॅक्सी सेवाया देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित असून, महिलांना वाहने चालविण्यास बंदी आहे. त्यामुळे महिला मतदारांना मतदान करण्यास जाताना अडचण येते. ही बाब ध्यानात घेऊन देशातील एका टॅक्सी कंपनीने पुढाकार घेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत टॅक्सी सेवा देण्याचे पाऊल उचलले. (वृत्तसंस्था)