वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे. नासाने (NASA) याबाबत अलर्ट दिला आहे. नासाने येत्या 2-3 दिवसांत पृथ्वीच्या जवळून 5 उल्का (Asteroid) जाणार असल्याचं म्हटलं आहे. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स नेटवर्कच्या मते, या सर्व उल्का पृथ्वीपासून 46.5 मैलांपेक्षा कमी अंतरावरून जाणार आहेत.
NASA ने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या प्रत्येक उल्केवर वैज्ञानिक लक्ष ठेवून आहेत. नासाची Sentry सिस्टम आधीपासूनच अशा संकटांवर लक्ष ठेवते. पुढच्या 100 वर्षांत अशा 22 उल्का येणार असल्याचा इशाराही दिला आहे. यातील काही उल्का पृथ्वीवर आदळण्याची किंवा जवळून जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री पहिल्या दोन उल्का Asteroid 2013XA22 (310 फूट, 18 दशलक्ष मैल दूर) आणि Asteroid 2020KZ3 (64 फूट, 7 दशलक्ष 61 हजार मैल दूर) पृथ्वीच्या जवळून गेल्या आहेत. मात्र या दोघांमुळे कोणतीही हानी झालेली नाही.
बुधवारी 65 फूट लांब आणखी उल्का Asteroid 2020KY 40 मैलांवरून जाईल. यानंतर दुसर्या दिवशी गुरुवारी आणखी एक 65 फूट लांब उल्का 36 लाख मैलांवरून जाईल. 11 जून रोजी 60 फूट लांब आणखी एक उल्का जाणार आहे. अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा एक मोठी उल्का 6 जून रोजी पृथ्वीच्या दिशेने आली होती. नासाकडून या उल्केचं नाव रॉक-163348 (2002 NN4) असे ठेवण्यात आलं होतं. याची लांबी 250 से 570 मीटर होती. नासाने दिलेल्या माहितीमध्ये ही उल्का सूर्याच्या जवळून पृथ्वीच्या कक्षेत आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'हा' फॉर्म्युला लागू होणार?
इलेक्ट्रिक टूथब्रश आला! एका चार्जिंगमध्ये महिनाभर दात घासणार
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ
CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा