वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्यानं चीनच्या भूमिकेवर प्रश्न विचारत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चीनवर निशाणा साधला आहे. चीनने गेल्या 20 वर्षांत जगाला 5 मोठी संकटे दिली आहेत. या संकटांमध्ये सार्स, एव्हिएन फ्लू, स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरस या 4 व्हायरसची चीनमधूनच उत्पत्ती झाली. आता संक्रमणांचा सिलसिला थांबवला पाहिजे. दुसरीकडे अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन खासदारांनी मंगळवारी असा कायदा आणण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळू शकेल.रॉबर्ट ओब्रायन म्हणाले, आम्हाला माहीत आहे की, कोरोना व्हायरस चीनमधील वुहान शहरातून जगभर पसरला आहे, याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. व्हायरसचा उगम प्रयोगशाळेतून झाला असेल किंवा मांस बाजारातून, पण पुन्हा पुन्हा चीनचे नाव येणं त्यांच्यासाठी चांगलं नाही. आता संपूर्ण जग चिनी सरकारला सांगेल की, आम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या संकटांचा सामना करू शकत नाही. ओ ब्रायन म्हणाले की, चीन इच्छा असती तर त्याला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवता आला असता. आम्ही आरोग्य तज्ज्ञांना पाठवण्याची ऑफर दिली होती, पण त्यांनी नकार दिला.सिनेटमध्ये बंदी घालण्याचा प्रस्ताववृत्तसंस्था एएफपीच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन खासदारांनी असा कायदा तयार केला आहे, ज्यामुळे ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळेल. खासदार जिम इनहॉफ यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'या जागतिक साथीला चीनच्या कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरायला हवे, कारण त्यातील त्यांची भूमिका निश्चित केली गेली आहे. चीनने संक्रमणाच्या प्रारंभाच्या काळात जगाला अंधारात ठेवले आणि विश्वासघात केला. चीनच्या या फसवणुकीने जगातील मौल्यवान वेळ आणि जीवन उद्ध्वस्त झाले आहे. 'प्रस्तावित कायद्याला 'कोविड-19 अकाउंटबिलिटी बिल' असे नाव देण्यात आलं आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांनी संसदेला 60 दिवसांच्या आत चीनने संक्रमणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे की नाही हे सांगावं लागणार आहे. चीनच्या भूमिकेत संशय आढळल्यास यासंदर्भात संयुक्त राष्ट्र किंवा त्यांच्याशी संबंधित संघटनांना(जसे की डब्ल्यूएचओ) स्वत: चा तपास सुरू करता येणार आहे. कायद्यानुसार ट्रम्प यांनी हे देखील सांगावं लागणार आहे की, चीननं खरंच वुहानमधला तो प्राण्यांचा बाजार बंद केलेला आहे की नाही. हाँगकाँगमध्ये अटक केलेल्या लोकशाही समर्थकांना सोडून दिले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊनच्या काळातही जामियाच्या विद्यार्थ्याला मिळाली ४१ लाखांच्या नोकरीची ऑफर
CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला
CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम
Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी
Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक