रशियाविरोधात पहिल्यांदाच उचललं भारतानं मोठं पाऊल; अमेरिका खुश, पुतिन काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:57 PM2022-08-25T23:57:41+5:302022-08-25T23:58:12+5:30

सुरुवातीपासून भारत कोणत्याही एका बाजूचे समर्थन करण्याचे टाळत होता आणि रशियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत नव्हता, त्यामुळे अमेरिकेसारखे अनेक पाश्चिमात्य देशही भारतावर नाराज होते.

For first time, India votes against Russia in UNSC during procedural vote on Ukraine | रशियाविरोधात पहिल्यांदाच उचललं भारतानं मोठं पाऊल; अमेरिका खुश, पुतिन काय करणार?

रशियाविरोधात पहिल्यांदाच उचललं भारतानं मोठं पाऊल; अमेरिका खुश, पुतिन काय करणार?

Next

नवी दिल्ली - रशिया यूक्रेन युद्धामुळे जगभरात रशियाच्या विरोधात युरोपियन देशांनी आक्रमक पवित्रा घेत रशियावर अनेक निर्बंध लादले. परंतु भारतानं रशियाविरोधात कुठलेही पाऊल उचललं नाही. मात्र पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनची बाजू घेत भारताने रशियाच्या विरोधात मतदान केले आहे.  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगातील अनेक देश दोन गटात विभागले गेले आहेत. 

या युद्धात अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे, तर अनेक देश रशियाच्या पाठीशी उभे आहेत. पण भारताने सुरुवातीपासूनच यावर ठाम भूमिका घेतली नव्हती. हे युद्ध चुकीचे असल्याचं सांगत भारत संवादातून वादावर तोडगा काढण्याची सातत्याने मागणी करत आहे. मतदानावेळी १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठकीला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले. विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच भारताकडून एकाच बाजूने मतदान होत आहे.

भारताच्या भूमिकेनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का
सुरुवातीपासून भारत कोणत्याही एका बाजूचे समर्थन करण्याचे टाळत होता आणि रशियाविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत नव्हता, त्यामुळे अमेरिकेसारखे अनेक पाश्चिमात्य देशही भारतावर नाराज होते. याचवेळी, भारताने रशियाकडून तेल खरेदी-विक्री सुरू केल्यावर पाश्चिमात्य देशांची ही नाराजी अधिकच वाढली होती. अशा स्थितीत भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे आता भारताला मैत्रीपूर्ण देश म्हणणाऱ्या रशियाची प्रतिक्रिया काय असेल हे पाहावे लागेल.

भारत घेत नव्हता ठोस भूमिका
रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारत सतत मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून शांततेचे आवाहन करत होता. भारताने एकदाही दोन्ही देशांबाबत आपली भूमिका मांडली नाही. याच कारणामुळे भारताने रशियाविरोधात केलेल्या मतदानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारत दोन वर्षांसाठी UNSC चे अस्थायी सदस्य आहे. भारताचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त रशियाबरोबरच्या सहा महिन्यांच्या युद्धाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सुरक्षा परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांनी प्रक्रियात्मक मतदान केले. प्रक्रियात्मक मतदान म्हणजे यूएनएससीच्या स्थायी सदस्याने व्हिटो केला असला तरीही तो ठराव स्वीकारणे. असे मतदान काही बाबतीतच केले जाते.

भारताने रशियाकडून तेल घेणे अमेरिकेला पसंत नाही
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असताना भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा करार केला होता. तेव्हापासून रशिया भारताला तेल देत आहे. विशेष बाब म्हणजे तेल खरेदीच्या बाबतीत रशिया हा भारताला सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा दुसरा देश ठरला आहे. मात्र तरीही भारताला तेल पुरवण्यात इराक पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे अमेरिकेला आवडले नाही आणि अमेरिकेने अनेकवेळा भारतावर नाराजी व्यक्त केली होती. तथापि, भारताने तेल खरेदीच्या बाबतीत कोणत्याही दबावाखाली येणार नाही आणि देशातील जनतेच्या हिताच्या करारावर पुढे जाईल, असे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, भारत आणि रशिया यांच्यातील तेल करारावर युक्रेनही खूश नाही.

Web Title: For first time, India votes against Russia in UNSC during procedural vote on Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.