१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 09:09 AM2023-06-17T09:09:49+5:302023-06-17T09:10:31+5:30
बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ल्यांचा वेग वाढविला आहे. आजवर धमकी देणाऱ्या पुतीन यांनी अण्वस्त्रांची पहिली खेप बेलारूसला पाठविली आहे. द हिलनुसार पुतीन यांनीच याची घोषणा केली आहे. मॉस्कोने बेलारूसला अण्वस्त्रांचा साठा पाठविला आहे. उर्वरित शस्त्रास्त्रे उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत तिथे नेली जाणार आहेत, असे ते म्हणाले.
बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना पुतीन म्हणाले की, रशिया आणि आमच्या धोरणात्मक पराभवाबद्दल विचार करणार्या सर्वांविरूद्ध हा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी रशियाचे अणुब़ॉम्ब आणि मिसाईल आमच्या देशात आल्याचा दावा केला होता. तो यामुळे खरा ठरत आहे. आमच्याकडे मिसाईल आणि बॉम्ब आहेत, जे रशियाने पाठविले आहेत. हे बॉम्ब हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर टाकलेल्या ब़ॉम्बपेक्षा तिप्पट संहारक आहेत.
१९९१ नंतर पहिल्यांदाच रशियाने परदेशात अण्वस्त्रे तैनात केली आहेत. लुकाशेन्को हे रशियाचे प्रमुख मित्र मानले जातात. बेलारूसची सीमा युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना जोडलेली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा लाँच पॅडम्हणून बेलारुसचाच वापर करण्यात आला होता. लुकाशेन्कोबद्दल बोलायचे झाले तर ते जवळपास 30 वर्षे (1994) सत्तेत आहेत. 2020 मध्ये, लुकाशेन्को सलग सहाव्यांदा बेलारूसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, जरी ही निवडणूक वादग्रस्त ठरली आणि देशात खूप हिंसाचार झाला.