वॉशिंग्टन : अमेरिकेला थेट उड्डाणे असलेल्या परदेशातील काही विमानतळांवरील सुरक्षा वाढविण्याचे आदेश ओबामा प्रशासनाने दिले आहेत. अमेरिकेचे गृहमंत्री जे जॉन्सन यांनी याबाबत घोषणा केली. तथापि, संबंधित विमानतळांची नावे त्यांनी उघड केली नाहीत. सिरिया आणि इराकच्या अनेक भागांवर कब्जा करून सुन्नी बंडखोरांनी इस्लामी खलिफा सरकारची घोषणा केल्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भारतात नवी दिल्ली आणि मुंबई विमानतळावरून अमेरिकेसाठी थेट उड्डाणे आहेत. (वृत्तसंस्था)
विदेशी विमानतळे; सुरक्षा वाढविण्याचे अमेरिकेचे आदेश
By admin | Published: July 04, 2014 5:20 AM