देशाची सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांबद्दल बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी मोठं विधान केले होते. ही राज्य सर्व बाजूंनी जमिनीने घेरली गेलेली असल्याचे ते म्हणाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर मंत्री यावर भाष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एस. जयशंकर म्हणाले, 'भारताकडे बंगालच्या उपसागरात ६५००० किलोमीटर लांब समुद्र किनारा आहे. भारताची फक्त सीमाच BIMSTEC सदस्य असलेल्या देशांसोबतच नाही, तर या क्षेत्रात दळणवळण वाढण्यासाठी काम करत आहे.'
'ईशान्येकडील राज्यात रस्ते, रेल्वे, जलवाहतूक आणि पाईपलाईनचे जाळे विस्तृत करण्याचे काम केले जात आहे", असे एस. जयशंकर म्हणाले.
मोहम्मद यूनुस काय म्हणालेले?
बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस म्हणालेले की, भारताच्या ईशान्येकडील राज्यात चीनला विस्ताराची संधी आहे.
"भारतातील ईशान्येकडील सात राज्ये अजूनही लॅण्डलॉक, अर्थात सर्व बाजूंनी जमिनीने वेढली गेलेली आहेत. बांग्लादेश हा या प्रदेशातील महासागराचा एकमेव संरक्षण आहे. भारतातील ईशान्येकडील सात राज्यांना समुद्रापर्यंत पोहचण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या प्रदेशासाठी महासागराचे एकमेव संरक्षक आहोत. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था इथे वाढू शकते", असे मोहम्मद यूनुस म्हणाले होते.